रावेरात अंगणवाडी सेविकेकडे धाडसी घरफोडी : साडेतीन लाखांचा ऐवज लंपास


रावेर (सोमवार, 21 सप्टेंबर 2026) : रावेर शहरातील नगरपालिका रस्त्यावरील मधूसूधन मेडिकल समोरील रहिवासी असलेल्या अंगणवाडी सेविकेच्या घरातून चोरट्यांनी तब्बल साडेतीन लाखांचा ऐवज लांबवल्याने शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांसाठी पर्वण
रावेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना सुभाष वाणी (62) या अंगणवाडी सेविका आहेत. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 ते दुपारी दोन वाजेदरम्यान चोरट्यांनी मागील दरवाज्याच्या दाराचे बिजागरे तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी दोन लाख रुपये किंमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे लॉकीट, एक लाख रुपये किंमतीच्या प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या तसेच 50 हजारांची रोकड मिळून एकूण तीन लाख 50 हजारांचा ऐवज लांबवला.

भर दिवसात झालेल्या घरफोडीची माहिती मिळाल्यानंतर कल्पना वाणी यांनी रावेर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !