राज्यस्तरीय कथा स्पर्धेत चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या ’हे सारं तुमचंच देणं’ कथेला प्रथम क्रमांक
चाळीसगाव (रविवार, 20 सप्टेंबर 2026) : स्व. बाबासाहेब केफनारखेडे स्मृती राज्यस्तरीय शिक्षकांसाठीच्या घेण्यात आलेल्या कथास्पर्धेत चाळीसगाव येथील आ.बं. मुलांचे हायस्कुलचे कलाशिक्षक तथा चित्रकार कवी दिनेश चव्हाण यांच्या षहे सारं तुमचंच देणं’ ह्या प्रेरणादायी कथेला प्रथम क्रमांक क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. स्पधेचा बक्षीस वितरण समारंभ सोमवार, 21 रोजी भुसावळातील प्रभाकर हॉलमध्ये पार पडला.
यांची होती उपस्थिती
संस्थेचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे अधिव्याख्याता प्रा.डॉ.साहेबराव भूकण, संस्थेचे पदाधिकारी पी.व्ही.पाटील, मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल यांच्या उपस्थितीत स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, पुस्तक संच, रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत महाराष्ट्र भरातून जवळपास 120 शिक्षकांनी सहभाग नोंदविला.

तीन वर्ष प्रथम येण्याचा मान
या अगोदरही चव्हाण यांनी शिक्षकांच्या काव्यलेखन स्पर्धेत सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकाने येण्याचा बहुमान मिळवला आहे. कथेच्या प्रवासातील त्यांचे हे यश देखील साहित्यिक उंची वाढवणारे आहे, त्यांना कला, साहित्य, शिक्षणक्षेत्रात अनेक मानाचे पुरस्कार देखील प्राप्त आहेत. त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल शाळेचे चेअरमन योगेश अग्रवाल, संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मुख्याध्यापक एम.बी.कुमावत, उपमुख्याध्यापक पी.डी.नेरकर, पर्यवेक्षक प्रवीण राजपूत, पर्यवेक्षिका सुनीता कासार, कार्यालयीन प्रमुख निरंजन लद्दे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.


