भुसावळातील हिंदी महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर


भुसावळ (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन प्राचार्य डॉ.रमेश जोशी व सांस्कृतिक विभागाच्या प्रा.अनुपम शर्मा व प्रा.ज्योती ओस्तवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

डॉ.तेजस कोटेचा यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचे मेडिकल चेकअप केले. त्यांना आवश्यकतेनुसार औषधी सांगितली. त्यांच्या शारीरिक समस्या जाणून घेऊन दररोजच्या जीवनात शारीरिक व्यायाम करण्याचा सल्ला दिला.तसेच आरोग्य विषयक तक्रारींसाठी सविस्तर मार्गदर्शन करीत आवश्यक सूचनाही दिल्या. प्रसंगी प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले की, प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे. मेडिकल चेकअपमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्यविषयक समस्या डॉक्टरांना विचारल्या आणि समाधान करून घेतले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले. सर्व विद्यार्थ्यांचे. वैद्यकीय परीक्षण करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !