भुलाबाई महोत्सवात मॅक्रो व्हिजन अकॅडमीची पुन्हा उंच भरारी!

जिल्हास्तरीय स्पर्धेत छोट्या गटात प्रथम क्रमांक ; विद्यार्थिनींना 5 हजारांचे पारितोषिक


रावेर (शनिवार, 3 ऑक्टोबर 2026) : केशव स्मृती प्रतिष्ठान, जळगाव संचलित ललित कला संवर्धिनीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव उत्साहात पार पडला. या स्पर्धेत मॅक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर येथील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत छोट्या गटात प्रथम पारितोषिक पटकावले. विजेत्या विद्यार्थिनींना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्रक तसेच पाच हजारांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थिनींवर कौतुकाचा वर्षाव
विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशामागे संगीत शिक्षक डिगंबर मुर्‍हाडकर, नृत्य शिक्षक रवि फुलमाळी आणि नृत्य शिक्षिका कारिका मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींची सुरक्षितता व कार्यक्रमाचे योग्य नियोजन समन्वयक भारती चौधरी आणि प्रीती कुलकर्णी यांनी सांभाळले.

पारंपरिक लोककलेचे प्रभावी सादरीकरण
विद्यार्थिनींनी सादर केलेल्या कार्यक्रमात तालबद्ध संगीत, आकर्षक नृत्य हालचाली आणि पारंपरिक वेशभूषेने विशेष लक्ष वेधून घेतले. विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेले पारंपरिक भुलाबाई गीत आणि त्याला दिलेली नृत्याची सुंदर जोड हे सादरीकरणाचे प्रमुख आकर्षण ठरले.
सुरेल गीत, तालबद्ध सादरीकरण, कल्पकता, पारंपरिक वेशभूषा आणि भुलाबाईच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडविणार्‍या या कलाविष्काराचे परीक्षकांनी विशेष कौतुक केले.

मान्यवरांकडून अभिनंदन
शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे आणि मुख्याध्यापक विजय जैन यांनी विजेत्या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. पारंपरिक भुलाबाई गीत व नृत्य ही महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे जिवंत प्रतिबिंब असून, विद्यार्थिनींनी आपल्या सादरीकरणातून परंपरा, इतिहास आणि लोकजीवनाचा सुंदर आविष्कार घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले. या यशाबद्दल शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील, जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील आणि शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.

उपाध्यक्ष अ‍ॅड.प्रवीण जी.पासपोहे आणि खजिनदार विजयजी. गोटीवाले यांनीही विजेत्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मॅक्रो व्हिजन अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी आपल्या अप्रतिम कलाविष्कारातून पुन्हा एकदा शाळेचा गौरव वाढविला आहे. पारंपरिक भुलाबाई गीत, संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून लोकसंस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा सुंदर संदेश दिला आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !