भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात आजी-आजोबा दिवस उत्साहात
भुसावळ (रविवार, 4 ऑक्टोबर 2026) : शहरातील के. नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आजी-आजोबा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सुमारे 40 पेक्षा जास्त आजी-आजोबा कार्यक्रमासाठी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांविषयीच्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांना आपल्या भावना व्यक्त करताना गहिवरून आले.
यांनी व्यक्त केले मनोगत
आजी-आजोबा दिवस कार्यक्रममाबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात विरभान पाटील सर, डॉ.पी.एस.कोळी, नवलसिंग सुपडू भोळे, पुष्पा मुरलीधर चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका अॅड.संगीता अडकमोल यांच्या मार्गदर्शनाने पार पडला. त्याप्रसंगी पर्यवेक्षक एस.एल.राणे, जोगी, सोनवणे उपस्थित होते. सूत्रसंचालन एन.के.बावस्कर व आर.डी.तायडे यांनी केले. पर्यवेक्षक एस.एल.राणे यांनी आभार मानले.


