भुसावळातील ओमकार क्रीडा मंडळाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा


भुसावळ (रविवार, 4 ऑक्टोबर 2026) : शहरातील ओमकार क्रीडा मंडळाचा नववा वर्धापनदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी ओमकार क्रीडा मंडळ व महाबली क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप महाजन होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाबली क्रीडा प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष संजय पाटील, महाराष्ट्र पोलीस दलातील प्रथमेश पाटील, मनीष निकम उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी ओमकार क्रीडा मंडळाचे सचिन पवार, आदित्य चौधरी, सोहम धनगर, गिरीष डोंगरे, कल्पेश डोंगरे, कृष्णा भारंबे, ललित पाटील, यश पाटील, अनिकेत डोंगरे, रितेश भटकर, रोहन धनगर, निलेश पाटील, भावेश सैतवाल, यश चौधरी, भावेश डोंगरे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कबड्डी सामन्याचे आयोजन
वर्धापनदिनानिमित्त कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. श्रद्धा नगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामन्यांचा उत्स्फूर्त आनंद घेतला. या आयोजनामुळे परिसरात क्रीडा क्षेत्राबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

प्रदीप महाजन यांनी ओमकार क्रीडा मंडळाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच खेळाडूंनी मेहनत, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात प्रगती साधावी, असे आवाहन केले.

आभार प्रदर्शन ओमकार क्रीडा मंडळाचे यश चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व खेळाडूंनी परिश्रम घेतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !