देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेला मुदतवाढ


भुसावळ (बुधवार, 7 ऑक्टोबर 2026) : मध्य रेल्वे प्रशासनाने शेतकरी तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढती प्रवासी मागणी लक्षात घेऊन देवलाली-दानापूर दरम्यान धावणार्‍या ‘शेतकरी समृद्धी अनारक्षित विशेष रेल्वे’च्या संचालन कालावधीत वाढ केली आहे. शेतकर्‍यांसाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे.

गाडी क्रमांक 01053 देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे गाडी दिनांक 10 ऑक्टोबर आणि 17. ऑक्टोबरचा रोजीचा संचालन कालावधी वाढविण्यात आला आहे. गाडी क्रमांक 01054 दानापूर-मनमाड शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे गाडी 12 व 19 ऑक्टोबर 2 026 रोजीचा संचालन कालावधी वाढविण्यात आला आहे. या विशेष रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रक, थांबे आणि संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या विशेष रेल्वे सेवेचा जास्ती-जास्त लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !