भुसावळात भारीपाच्या आंदोलनात आमदार, नगराध्यक्ष मुर्दाबादच्या घोषणा


रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांचा अनोख्या पद्धत्तीने निषेध : खड्ड्यांपासून नागरीक वाचण्यासाठी लावला फलक

भुसावळ : अमृत योजनेमुळे शहरातील चांगले डांबरी रस्ते उखडल्याने शहरवासीयांना अतोनात हाल-अपेष्टांचा सामना करावा लागत असून लोकप्रतिनिधींविषयी प्रचंड रोषाचे वातावरण असताना भारीप बहुजन महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी शहर पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेल गौरवसमोर आमदार व नगराध्यक्षांच्या मुर्दाबादच्या घोषणा देत मंगळवारी दुपारी तीन वाजता अनोखे आंदोलन केले. आमदार व नगराध्यक्षांच्या मेहरबानीने तुमचा जीव जावू शकतो, खाली तीन फुटाचा खड्डा असल्याचा फलक लावून लोकप्रतिनिधी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

यांचा आंदोलनात समावेश
भारीपचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, तालुकाध्यक्ष रूपेश साळुंके, शहराध्यक्ष गणेश जाधव, जिल्हा महासचिव दिनेश इखो, युवा जिल्हा उपाध्यक्ष तुषार जाधव, जिल्हा नेते सुदाम सोनवणे, विद्यासागर खरात, अरुण तायडे, अरुण नरवाडे, निलेश जाधव, रोहित तायडे, आकाश जाधव, रोहण तायडे, प्रमोद बावस्कर, संदीप सुरवाडे, प्रल्हाद घारू आदींच्या उपस्थितीत आंदोलन करून लोकप्रतिनिधींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.


कॉपी करू नका.