पहिले लग्न लपवत लावले दुसरे लग्न : चिंचखेडच्या महिलेसह सात जणांविरोधात गुन्हा
बोदवड (शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2026) : महिलेचे पहिले लग्न झाले असतानाही दुसरे लग्न लावत दुसर्या पतीपासून महिलेला गर्भधारणा झाल्यानंतर तिचा परस्पर गर्भपात करून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार बोदवड तालुक्यात घडला आहे. या प्रकरणी चिंचखेडच्या महिलेसह सात जणांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
बोदवड शहरातील पंकज मुरलीधर पाटील (26) या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा विवाह अश्विनी सुरेश महाजन (चिंचखेड, ता.जामनेर) या तरुणीशी लावण्यात आला मात्र यापूर्वीच अश्विनी यांचा विवाह झाला असून ही बाब लपवून ठेवण्यात आली तसेच त्यांना लग्नानंतर गर्भधारणा झाल्यानंतर संशयीतांनी तरुणासह कुटूंबियांना माहिती न देता परस्पर गर्भपात करीत आर्थिक फसवणूक करण्यात आली.
या संशयीताविरोधात गुन्हा
अश्विनी सुरेश महाजन, सुरेश नारायण महाजन, अलका सुरेश महाजन, विशाल सुरेश महाजन, अरुण खरात (चिंचखेड, ता.जामनेर), शिवाजी राजाराम खैरे, भावराव तोताराम चौधरी (दोन्ही रा.सामरोद, ता.जामनेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नाईक विजय पढार करीत आहेत.
