भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात
भुसावळ (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शुक्रवार, 26 रोजी संविवधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे विद्यार्थ्यांनी सामूहिक वाचन केले. परीसरात प्रभात फेरी काढण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी संविधानाबद्दल घोषवाक्ये म्हणण्यात आली. संविधान व्याख्यानमाला व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
विविध स्पर्धांचे आयोजन
गटनिहाय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. चित्रकला व पोस्टर स्पर्धा आपले संविधान आपला अभिमान या विषयावर घेण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. पर्यवेक्षिका राखी बढे यांनी चे मार्गदर्शन केले. प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षिका-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
