भुसावळातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात भारतीय संविधान दिवस साजरा
सशक्त भारताच्या निर्माणासाठी भारतीय संविधान महत्त्वपूर्ण : प्राचार्य रमेश जोशी
भुसावळ (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2026 रोजी भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला.
लोकतंत्र मजबूत बनवण्यास संविधा महत्त्वपूर्ण
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी भारतीय संविधान हे देशाच्या शासन व्यवस्थेचा आधार आहे व सशक्त भारत निर्माण करण्या साठी भारतीय संविधान हे महत्त्वपूर्ण आहे. डॉ. सुधीर शर्मा यांनी संविधान भारतीय नागरिकांना समानता, स्वातंत्र्य, न्यायाचा अधिकार प्रदान करते व देशातील नागरिकांना अधिकार व कर्तव्य कोणते आहेत याची जाणीव करून देते, असे विचार मांडले. याप्रसंगी महाविद्यालयीन समस्त प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
