भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन


भुसावळ (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या निर्देशानुसार गुरुवार, दि. 26 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता महाविद्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधान हे केवळ देशाच्या शासनव्यवस्थेचे मार्गदर्शक दस्तऐवज नसून प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेने, स्वाभिमानाने आणि न्यायाने जीवन जगण्याची प्रेरणा देणारा राष्ट्रीय मूल्यांचा आधार आहे. संविधानातील तत्त्वांचे पालन करणे, लोकशाही बळकट करणे, सामाजिक सलोखा राखणे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये पार पाडणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक, प्रा.डॉ.टी.के.पाटील (मुक्ताईनगर), प्रा.मच्छिंद्र पाटील (फैजपूर), विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.राजेश ढाके, रासेयो अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !