भुसावळ रेल्वे विभागात संविधान दिन उत्साहात


भुसावळ (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : भुसावळ रेल्वे विभागातील विविध रेल्वे स्थानके व डेपो येथे ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून घेतले.

या कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी भारतीय संविधानात अंतर्भूत असलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या महान आदर्शांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. तसेच संविधानाची मूलभूत भावना, संवैधानिक मूल्ये आणि लोकशाही तत्त्वे आपल्या आचरणात व कार्यपद्धतीत आत्मसात करण्याचा संकल्प केला. रेल्वे कर्मचार्‍यांमध्ये भारतीय संविधानाप्रती आदर व जागरूकता वाढविणे, तसेच संवैधानिक मूल्ये, लोकशाही आदर्श आणि नागरिकांच्या कर्तव्यांप्रती निष्ठा व बांधिलकीची भावना दृढ करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी विभागातील विविध शाखाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !