भुसावळातील बियाणी फार्मसी कॉलेजमध्ये संविधानाच्या मूल्यांचे स्मरण !
भुसावळ (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : भारतीय संविधान दिनानिमित्त .शहरातील बियाणी फार्मसी कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साही आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये तसेच समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्त्वांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर केली.
26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणार्या शूर जवान, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी हुतात्म्यांच्या शौर्य, त्याग आणि बलिदानाचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली.
यांची होती उपस्थिती
संस्थेच्या सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी, बियाणी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुशील एस.नारखेडे, प्रा.आकाश एस.इंगळे, बियाणी मिलिटरी स्कूलचे प्राचार्य डी. एम. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
