भुसावळातील द वर्ल्ड स्कूलच्या प्राचार्यपदी दीपक तावडे ; उपप्राचार्यपदी जेनिफर सोनवणे
भुसावळ (शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2026) : भुसावळ शहरातील नामांकित द वर्ल्ड स्कूलमध्ये शैक्षणिक वर्षाच्या दुसर्या सत्राच्या प्रारंभी नवीन शैक्षणिक नेतृत्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यालयाच्या प्राचार्यपदी दीपक अभिमन्यू तावडे तर उपप्राचार्यपदी मिस जेनिफर सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. दोघांनीही आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
नवीन नेतृत्वाच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक वाटचालीला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, बौद्धिक आणि सर्वांगीण विकास साधण्यासोबतच आधुनिक शिक्षणपद्धती, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षणाला प्राधान्य दिले जाणार आहे.
या नियुक्तीनिमित्त शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने सीए रोहित कोलते व पदाधिकार्यांनी नवनियुक्त प्राचार्य दीपक अभिमन्यू तावडे आणि उपप्राचार्या जेनिफर सोनवणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
नवीन नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली द वर्ल्ड स्कूल शैक्षणिक क्षेत्रात नवी उंची गाठेल, असा विश्वास यावेळी शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला.
