आमदार गोपीनाथ पडळकर माफी मागा नाही तर तोंडाला काळे फासणार


भुसावळात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचा इशारा : प्रतिमेला जोडे मारून नोंदवला वक्तव्याचा निषेध

भुसावळ : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी तातडीने राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांची माफी मागावी अन्यथा जिथे ते भेटतील तिथे त्यांचे तोंड काळे करण्यात येईल तसेच ते जेथे दिसतील तेथे राष्ट्रवादी युवकचे कार्येकर्ते चोप देतील, असा इशारा भुसावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी दिला. पडळकर यांच्या प्रतिमेला जोडून मारून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला तसेच प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन देवून पडळकरांची आमदारकी रद्द करण्यासह त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परीषद सदस्य रविंद्र नाना पाटील, कृषी बाजार समिती सभापती सचिन संतोष चौधरी, तालुकाअध्यक्ष दीपक मराठे, शहाध्यक्ष नितीन धांडे, न.पा.गटनेते दुर्गेश ठाकूर, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, युवक तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, युवक शहराध्यक्ष रणजीत चावरीया, राहुल वाघ, भूपेंद्र तायडे, शाकिर पिंजारी, योगेश नरोटे, अमोल मांडे आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !