भाजपाच्या नव्या कार्यकारीणीत खडसे-तावडेंना स्थान नाहीच


मुंबई : भारतीय जनता पार्टीने शुक्रवारी जाहीर केलेल्या महाराष्ट्र कार्यकारीणीत पुन्हा माजी मंत्री एकनाथराव खडसेंसह विनोद तावडेंना डावलण्यात आले आहे. नव्या कार्यकारणीत अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली शिवाय खडसे-तावडेंसोबत माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा डावलण्यात आल्याची बाब समोर आली आहे. असे असलेतरी पंकजा मुंडे यांना केंद्राच्या कार्यकारीणीत जबाबदारी देणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

यांची झाली निवड
भाजपाच्या कार्यकारीणीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील तर महामंत्री म्हणून सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक यांनी वर्णी लागली आहे तर उपाध्यक्षपदी राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हाळवणकर, प्रसाद लाड, प्रीतम मुंडे, चित्रा वाघ यांना स्थान देण्यात आलं आहे. तसेच कोषाध्यक्ष म्हणून मिहीर कोटेचा, प्रतोद माधुरी मिसाळ उमा ताई खापरे यांनी निवड करण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !