रोटरी क्लब भुसावळचा पदग्रहण सोहळा उत्साहात


नूतन अध्यक्ष गजानन ठाकूर यांनी डॉ.रवींद्र शुक्ला यांच्याकडून स्वीकारली सूत्रे

भुसावळ : रोटरी क्लब भुसावळचा पदग्रहण सोहळा सोमवारी उत्साहात पार पडला. ऑनलाईन माध्यमांद्वारे पार पडलेल्या या सोहळ्यास रोटरीचे डिस्ट्रीक्ट 3030 चे प्रांतपाल रो.शब्बीर शाकीर, सहाय्यक प्रांतपाल धर्मेंद्र मेंडकी, रोटरी भुसावळचे नूतन अध्यक्ष गजानन ठाकूर (जी.आर.मामा), राधेश्याम लाहोटी, मध्य रेल्वेच्या डॉ.सुमन देऊळकर, मावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शुक्ला, मावळते सचिव राजेंद्र फेगडे, नूतन सचिव प्रा.डॉ.गिरीश कुलकर्णी, कोषाध्यक्ष ऋषी शुक्ला आदी उपस्थित होते.

नूतन पदाधिकार्‍यांनी स्वीकारले सूत्र
मावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शुक्ला यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नूतन अध्यक्ष गजानन ठाकूर (जी.आर.मामा) यांच्याकडे तर सचिवपदाची सूत्रे राजेंद्र फेगडे यांनी नूतन सचिव प्रा.डॉ.गिरीश कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केली. मावळत्या अध्यक्षांनी गतवर्षीच्या कार्याचा अहवाल सादर केला. नूतन अध्यक्ष गजानन ठाकूर यांनी आपल्याला हा महान कार्याचा वसा पुढे चालवण्यासाठी मिळाला हे आपले भाग्य असल्याचे ते म्हणाले. आपण भविष्यात समाजोपयोगी कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. वृक्षारोपण, आरोग्य आणि स्वछता ह्या घटकांवर आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रांतपाल रो.शब्बीर शाकीर यांनी नवीन कार्यकारीणीला शुभेच्छा देतांना सेवा हा रोटरीचा आत्मा असल्याचे सांगितले. त्यानंतर वार्षिक अहवालाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

रोटरीची नूतन कार्यकारीणी अशी
रोटरी वर्ष 2020-21 ची कार्यकारीणी अशी- अध्यक्ष- गजानन ठाकूर, सचिव प्रा.डॉ.गिरीश कुलकर्णी, कोषाध्यक्ष ऋषी शुक्ला, माजी अध्यक्ष डॉ.रवींद्र शुक्ला, भावी अध्यक्ष राजेंद्र फेगडे, राजीव सहगल, मानद विशेष सचिव आरती चौधरी, उपसचिव रुपेश जैन, उपाध्यक्ष सतीश अग्रवाल तसेच कार्यकारी मंडळ आणि सल्लागार मंडळात डॉ.नारायण आर्वीकर, डॉ.माया आर्वीकर, आशिष अग्रवाल, राजीव सहगल, राजेश अग्रवाल, सारंग चौधरी, महेश भराडे, अशोक काबरा, राजेश अग्रवाल, डॉ.सुवर्णा सोनार, राजेश जोशी, एच.एस.पी.राव, बी.टी.अग्रवाल, अरुण मांडळकर, दीपक अग्रवाल, हेमंत नाईक, दिलीप खंडेलवाल, विकास कात्यायनी यांचा समावेश आहे. राधेश्याम लाहोटी, मदन बोरकर, जी.आर.अय्यर हे नवीन रोटरी क्लब सदस्य म्हणून रोटरी क्लब बरोबर जोडले गेले. सूत्रसंचालन डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी केले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !