निंभोर्‍यात कोरोनाचा शिरकाव : एकाला बाधा


निंभोरा : सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना निंभोरा गाव मात्र कोरोनामुक्त होते मात्र सोमवारी आलेल्या अहवालात गावातील 50 वर्षीय रुग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने गावात खळबळ उडाली. निंभोरा स्टेशन भागातील हनुमान नगर भागात संबंधित रुग्णाचा रहिवास असल्याने घराजवळील गल्ली भागाचा कंटन्मेंट झोनमध्ये समावेश करण्यात आला. निंभोरा ग्रामपंचायत प्रशासनाने त्या भागात निर्जंतूकीकरण केले असून या भागात ग्रामस्थांना जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, बाधीत रुग्णाच्या पत्नीसह मुलीसह व नात यांना रावेर येथील कोविड सेंटर येथे पुढील आरोग्य तपासणीसाठी पाठविण्यात आले.

अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन
नभोरा ग्रामपंचायतीचे सरपंच डिगंबर चौधरी यांनी निंभोरा गावातील जनतेला अत्याआवश्यक कामाशिवाय आपल्या घरातून बाहेर निघू नये, असे आवाहन केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !