रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजन सेंटरची उभारणी होणार


ओपीडी अन्य ठिकाणी हलवणार : प्रांताधिकार्‍यांनी नगरपालिकेच्या जुन्या रुग्णालयाची केली पाहणी

रावेर : रावेर तालुक्यातील हायरीक्स कोरोनाबाधीत रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध व्हावे म्हणून रावेर ग्रामीण रुग्णालय कोरोना ऑक्सिजन सेंटर करण्याच्या विचाराधीन प्रशासन असून तर येथील दरोरोजची ओपीडी इतर ठिकाणी हलवण्याचा प्रशासन विचार करत आहे. मंगळवारी रावेर शहरातील बंद पडलेल्या नगर पालिकेच्या जुन्या हॉस्पिटलची प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी पाहणी केली.

तर रावेरातच हायरीस्कर रुग्णांवर उपचार
मंगळवारी प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोयी-सुविधांची आढावा घेण्यासाठी रावेर गाठले. यावेळी हाय-रिक्स कोरोनाबाधीत रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता जाणवल्यास त्यांना जळगाव हलवावे लागत असल्याने प्रांताधिकारी यांनी लोकवर्गणीतून रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनची पाईप लाईन बसवून सुमारे 60 पलंगावर व्हेंटीलेटर लावण्याचा तसेच हाय रीक्त रुग्णांना येथे दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रशासन विचार करीत असल्याची माहिती दिली.

जनआरोग्यासाठी लोकवर्गणी गरजेची ः प्रांताधिकारी
रावेर तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असून त्यांना योग्य-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तालुक्यातील कोणत्याही रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होऊ नये म्हणून जनआरोग्यासाठी तालुक्यातील दात्यांनी स्वयंस्फूर्तीने शासनाला मदत करावे, असे आवाहन फैजपूर प्रांताधकिारी अजित थोरबोले यांनी केले आहे. मंगळवारी सरपंच संघटनेची बैठक घेऊन मदतीचे आवाहनदेखील करण्यात आले.

इतर रुग्णांसाठी पर्यायी जागेची पाहणी
रावेर ग्रामीण रुग्णालयात कोविड ऑक्सिजन सेंटर केल्यास येथील दरोरोजचे पेशंटच्या तपासणीसाठी प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे, मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी बस स्थानका समोरील बंद पडलेल्या जुन्या पालिका रुग्णालयाची पाहणी करून चर्चा केली




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !