दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी धुळ्यात धरणे आंदोलन
धुळे : कॉरीडॉर प्रकल्प विकास समितीच्या वतीने शहरातील जेल रोडवर बेमुदत धरणे आंदोलनास बुधवारपासून प्रारंभ करण्यात आला. कॉरीडॉर प्रकल्प विकास समितीच्या वतीने गेल्या अनेक महिन्यापासून हा प्रकल्प लवकर सुरू व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. या समितीने प्रकल्पासाठी पाठपुरावा म्हणून स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री, पर्यटन मंत्री, आदींची भेट घेऊन त्यांना देखील या प्रकल्पाला लवकर सुरूवात व्हावी, अशी मागणीही केली आहे. या प्रकल्पामुळे धुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलू शकतो, बाहेर देशातील गुंतवणूक या ठिकाणी होऊ शकते, हजारो तरुणांना या प्रकल्पाच्या मध्येमातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. या प्रकल्पाचे औरंगाबाद येथे अतिशय भव्य-दिव्य काम असून त्याच धर्तीवर हा प्रकल्प लवकरात-लवकर धुळे येथेदेखील सुरू व्हयला पाहिजे, अशी या संघटनेचे प्रमुख रणजीत राजे भोसले यांची मागणी आहे.