पालकमंत्री म्हणाले, माजी मुख्यमंत्र्यांना होवू नये कोरोना !


जळगाव : राज्यात सत्ता आणणे म्हणजे बैलजोडी घेण्यासारखे आहे का ? असा प्रशव्न जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित करीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देव करो, कोरोना होऊ नये, अशी कोपरखळी जळगावात लगावली आहे. जनतेच्या काळजीमुळे राज्यभर दौरा करीत असल्याचे सांगत फडणवीस यांनी माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना मला या दौर्‍यात कोरोना झाला तर शासकीय रुग्णालयातच दाखल करावे’, असे व्यक्तव्य केल्यानंतर त्यावर पाटील यांनी टोला लगावला आहे. जळगाव जिल्ह्यातील वरणगावातील नियोजित पोलिस प्रशिक्षण केंद्राचे आदेश येत्या बुधवारपर्यंतप्राप्त होतील, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !