अत्याचार प्रकरणी खडक्यातील आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
भुसावळ : बोदवड पोलिस ठाण्यात अत्याचाराच्या गुन्ह्याप्रकरणी तालुक्यातील खडका येथील आरोपीस गुरुवारी दुपारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आकाश भगवान माळी (रा.खडका, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्यास बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बोदवड पोलिस ठाण्यात गुरनं.03/2019, भादंवि 366, 376 (1) अन्वये गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात संशयीत पसार होता. गुरुवारी गोपनीय माहितीवरून गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, राजेंद्र पाटील, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, किशोर राठोड, विनोद पाटील, अरुण राजपूत, रणजीत जाधव आदींनी आरोपीस अटक केली.