भुसावळात कल्याण मटका घेताना एकास अटक


भुसावळ : शहरातील नाहाटा चौफुलीकडील पाण्याच्या टाकीजवळील टपरीच्या आडोशाला संशयीत आरोपी दीपक जयकिसन चेलाणी (43 रा.कालिका माता मंदिराजवळ, सिंधी कॉलनी, भुसावळ) हा स्वत:च्या फायद्यासाठी कल्याण मटका खेळताना आढळल्याने त्यास अटक करण्यात आली. मंगळवारी दुपारी तीन वाजता ही कारवाई करण्यरात आली. आरोपीच्या ताब्यातून 560 रुपयांची रोकड व सट्टा-जुगाराची साधने जप्त करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक संदीप परदेशी, अनिल मोरे, रमण सुरळकर, रवींद्र बिर्‍हाडे, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, कृष्णा देशमुख आदींनी केली. तपास नाईक रमण सुरळकर करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !