रोटरी नेच दिले समाजकार्याचे बाळकडू : आमदार संजय सावकारे


नूतन अध्यक्ष संदीप जोशी व सचिव विशाल शाह यांनी पदभार स्वीकारला

भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचा पदग्रहण सोहळा ऑनलाईन झाला. याप्रसंगी विशेष अतिथी आमदार संजय सावकारे व रोटरीचे उप प्रांतपाल योगेश भोळे तर भावी प्रांतपाल रमेश मेहेर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. रेल सिटीचे नूतन अध्यक्ष संदीप जोशी व सचिव विशाल शाह यांनी मावळते अध्यक्ष अनिकेत पाटील तसेच सचिव मनोज सोनार यांच्याकडून पदभार स्वीकारला.

रोटरीचा सिंहाचा वाटा -आमदार संजय सावकारे
अनिकेत पाटील यांच्या वतीने माजी अध्यक्ष सोनू मांडे यांनी गत वर्षातील कामगिरीचा लेखाजोखा मांडला तर संदीप जोशी यांनी येणार्‍या काळात राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. संचालक मंडळ स्थापन केले तसेच नवीन सदस्य तेजस नवगळे, रजत बढे व किरण मुळे यांचे स्वागत केले. रोटरीचे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांचा संदेश योगेश भोळे यांनी वाचून दाखवला. आमदार संजय सावकारे यांनी त्यांच्या आमदारकीच्या जडण घडणीत रोटरीचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद केले. अध्यक्षीय भाषणात रमेश मेहेर यांनी रोटरी रेल सिटी राबवत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले व आगामी वर्षासाठी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ.मकरंद चांदवडकर यांनी सूत्रसंचालन केले. या ऑनलाईन कार्यक्रमास रोटरी रेल सिटीचे सदस्य, प्रांत 3030 चे पदाधिकारी , मार्गदर्शक आदी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !