बोदवडमध्ये कामाचे पैसे मागितल्याने 28 वर्षीय युवकाला मारहाण
पित्यासह दोघा मुलांविरुद्ध बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
बोदवड : ट्रकवर क्लिनर असल्याने मजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून 28 वर्षीय तरुणास मारहाण झाल्याची घटना सोमवारी मलकापूर रोडवरील रवी शेळके यांच्या घराजवळ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी पवन ईश्वर महाजन (28, खंडेलवाल पेट्रोल पंप मागे, मलकापूर रोड, बोदवड) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी मुस्ताक शहा व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीकडे महाजन यांनी ट्रकवरील क्लीनर म्हणून कामा केल्याने मजुरीचे पैसे मागितल्याने तिघा आरोपींनी शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच तक्रारदाराच्या डोक्यात टॉमी मारून गंभीर दुखापत केली. तक्रारदार उपचार करून घरी आल्यावर बोदवड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तपास हवालदार महाजन करीत आहे.

