हिंगोण्याचा पाणी प्रश्न सुटला : अनिल चौधरींचा ग्रामस्थांनी केला सत्कार
यावल : तालुक्यातील हिंगोणा येथे विविध कार्यकारी दुध सोसायटीत भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल छबीलदास चौधरी यांनी जनसंपर्क सभा घेतली. यावेळी त्यांनी मनोगतात रावेर-यावल मतदारसंघातील समस्यांचा आढावा घेत मतदारसंघाचा विकास हाच ध्यास असल्याची ग्वाही दिली. अनिल चौधरी यांनी हिंगोणा गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीची बंद पडलेली विहिर स्वःखर्चाने सुरू केली तसेच ठेका पद्धत्तीने उपसास करण्यास दिली. यावेळी या विहिरीचे भूमिपूजन करण्यात आले. गावातील समस्या सोडवल्याने प्रसंगी चौधरी यांचा सत्कार केला.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमप्रसंगी देवा तायडे, पंकज कोळी, फारूक मणियार, शरीफ मनियार, विजु बोदडे, संदीप धनगर, हर्षल जावळे, शेख शोहेब, अमजद तडवी, कबीर तडवी, फरमान तडवी, शशिकांत तायडे, हमीद तडवी, निळु सोनवणे आदी सभेला असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.