साकेगावात वॉर्ड क्रमांक एकमध्ये रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन
साकेगाव : गावातील वॉर्ड क्रमांक एकमधील गणपती नगरातील सुंदर लोकवस्तीमध्ये 14 व्या वित्त आयोगातून रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरीक श्रीराम सपकाळे व सुरेश सोनवणे यांच्याहस्ते नारळ वाढवून करण्यात आला. प्रसंगी वॉर्ड क्रमांक एकचे ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच आनंद ठाकरे प्रभाकर सोनवणे, दुसाने, किरण कापसे, गणेश सोनवणे, विक्रम सोनवणे यांच्यासह वॉर्डातील नागरीकांची उपस्थिती होती.
गावात काँक्रिटीकरणासह पेव्हर ब्लॉक बसणार
ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील सर्वांगीण रस्त्याचे काँक्रिटीकरण व छोट्या गल्ल्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेतला आहे. 14 व्या वित्त आयोगातून धार्मिक स्थळे गावातील प्रमुख चौक तसेच काही छोट्या गल्ल्यांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याचे कामे मार्गी लागले असून लवकरच संपूर्ण गावातील रस्ते 100 टक्के काँक्रिटीकरण युक्त होतील, अशा पद्धतीचे नियोजन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे. गाव राज्यस्तरीय मॉडेल व्हिलेज म्हणून सन्मानित होईल, असा विश्वास संपूर्ण सरपंच अनिल पाटीलसह समस्त ग्रामपंचायत कमिटी, ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे व ग्रामस्थांना आहे. यासाठी भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे व भाजपा प्रदेश सरचिटणीस खासदार रक्षा खडसे आदींचे विशेष सहकार्य लाभत आहे.

