मुलीच्या वाढदिवसानिमित्त सॅनिटायझर मशीनचे वाटप
बोदवडमधील हरीतमित्र संजय वराडे यांचा उपक्रम
बोदवड : दुआएँ मिल जाये सब की, बस यही काफी है, दवाएँ तो किमत अदा करने पर मिल ही जाती है ॥ या वाक्याची अनुभूती गुरुवारी बोदवडकरांना आली. बोदवडमधील हरीतमित्र संजय वराडे यांनी आपली कन्या साक्षीच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या कठीण काळात अहोरात्र सेवा बजावणार्या डॉक्टरांसह महसूल, पोलिस, नगरपंचायत अधिकारी व कर्मचार्यांना सॅनिटायझर मशीनचे वाटप केले. आपणही समाजाचं काही तरी देणं लागतो ही उदात्त भावना ठेवून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दहा सॅनिटायझर मशीनचे वाटप
कोरोनाच्या काळात डॉक्टरांसह महसूल, पोलिस, नगरपंचायत विभागात काम करणार्या अधिकारी व कर्मचार्यांसाठी स्वखर्चातून दहा अॅटोमॅटीक सॅनिटायझर मशीनचे वाटप करण्यात आले. याकामी साक्षीचे काका संजू तायडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दरम्यान बोदवड तहसील कार्यालयासह ग्रामीण रुग्णालय, पोलिस स्टेशन, नगरपंचायत कार्यालय, एणगाव येथील गो.द.ढाके विद्यालय, आदर्श गाव मानमोडी ग्रामपंचायत कार्यालयात मशीन लावण्यात आले. जलचक्र येथे जि.प.शाळेत वड तसेच निंब वृक्षाची लागवड करण्यात आली. यावेळी सरपंच जलचक्र, मुख्याध्यापक तसेच गुरूजन मंडळी, अमोल पाटील व वराडे परीवाराचे वैचारीक मित्र संतोष खराटे उपस्थित होते.

