बोदवड तालुक्यात युरीयाचा पुरवठा तत्काळ करावा


भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदन

बोदवड : तालुक्यातील शेतकर्‍यांना शहरातील कृषी केंद्रावर युरीया उपलब्ध नसल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लात आहे. या संदर्भात तातडीने युरीया उपलब्ध करावा, अशी मागणी भाजपा पदाधिकार्‍यांनी बोदवड तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेनाद्वारे केली.

युरीया न मिळाल्यास शेतकर्‍यांवर संकट
निवेदनाचा आशय असा की, बोदवड तालुक्यातील लोक हे शेत व्यवसायाशी निगडीत असून शेतकर्‍याचे उत्पन्न शेतीवर अवलंबून आहे. तालुक्यात दरवर्षी कमी प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे व पैसे खर्च करून, कर्ज घेऊन शेतकरी आपल्या शेतीची मशागत करतो. अश्यावेळी जर शेतकर्‍याला रासायनिक खते (युरीया) जर मिळाला नाही तर शेतीच्या उत्पन्नावर मोठी घट होऊन शेतकर्‍यांना आत्महत्या करण्यास भाग पर्याय राहणार नाही. बोदवड तालुक्यात रासायनिक खताचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात यावा व तसे न केल्यास भाजपाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या निषेध करण्यासाठी भारतीय युवक मोर्चा व भाजपाच्या वतीने पुढील चार ते पाच दिवसात तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी भाजपाचे बोदवड तालुकाध्यक्ष विनोद कोळी, जिल्हा परीषद सदस्य वर्षा पाटील, पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास पाटील, भाजपाचे बोदवड शहराध्यक्ष किरण वंजारी, विजय चौधरी, सचिन राजपूत, मधुकर राणे, प्रदीप बडगुजर, जीवन राणे, राम आहुजा, विजेंद्र पाटील व नगराध्यक्ष पती सईद बागवान, रुपेश गांधी, दीपक वाणी यांची उपस्थिती होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !