यावलमध्ये उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचा निषेध


राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपराष्ट्रपतींना 11 हजार पत्र पाठवणार

यावल : भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कृतीच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली यावल युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘जय भवानी, जय शिवराय’ मजकूर लिहिलेले तब्ल 11 हजार पत्र उपराष्ट्रपतींना पाठवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष देवकांत बाजीराव पाटील यांनी दिली. नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य निवडीच्या वेळीस शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या. त्यावर, हे राज्यसभेचे सभागृह नव्हे माझे दालन आहे. दालनात घोषणाबाजी करू नये, सभागृहातही घोषणा देण्याची मुभा नसते, शपथ घेताना घोषणा देऊ नका त्याची नोंद होणार नाही, अशी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज दिली होती.

भाजपा नेत्यांच्या मनात द्वेष भावना
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भाजपाच्याच खासदाराला ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा देण्यापासून रोखलं. यावरुन भाजपाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय भावना आहेत हे दिसून आले तसेच महाराष्ट्राबद्दल भाजपा नेत्यांच्या मनात किती द्वेष आहे आहे हे दिसून येते. छत्रपती आणि महाराष्ट्राचा अपमान करणार्‍या दिल्लीने लक्षात ठेवावे की, आमच्या रगारगात शिवछत्रपतींचे रक्त आहे आणि पुन्हा एकदा आम्ही दिल्ली महाराष्ट्रासमोर झुकवू, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अ‍ॅड.देवकांत बाजीराव पाटील म्हणाले. या सर्व घटनेचा निषेध म्हणून यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 11 हजार पत्रे पाठवून निषेध केला जाणार आहे. यावेळी यावल पोस्ट ऑफिसमध्ये नायडूंच्या कृतीच्या निषेधार्ह पत्रे पाठवण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी यावल युवक अध्यक्ष देवकांत पाटील, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील (गिरडगाव), जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाटील, तालुका सरचिटणीस किशोर गोलू माळी, हितेश गजरे, अमोल दुसाने, आशुतोष पाटील, राकेश सोनार, शरीफ तडवी, नरेंद्र सोनवणे, महेंद्र तायडे, ओम पाटील, निलेश बेलदार, भूषण पाटील, पावन राजपूत, अनिल पाटील आदींची उपस्थिती होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !