लाखो नागरीकांपर्यंत मन्सुरा काढा पोहोचवणे हाच उद्देश : हाजी मुन्ना तेली


भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रोगप्रतिकार शक्ती वाढवणार्‍या काढ्याची चांगलीच चलती असून त्यास मागणीदेखील तितकीच मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मालेगावात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बाधीतांचे प्रमाणही अधिक असल्याचे समोर आल्याने तेथे मन्सुरा मेडिकल युनानी कॉलेजमध्ये नऊ जडी-बुटींचे मिश्रण असलेला व रोग प्रतिकारक शक्ती असलेला काढा तयार करण्यात आल्यानंतर त्याचे चांगले रीझल्ट समोर आल्यानंतर अल्पावधीत हा काढा महाराष्ट्रभर फेमस झाला. भुसावळात देखील वाढत्या रुग्ण संख्येनंतर भाजपाचे गटनेता मुन्ना तेली यांनीदेखील मालेगावात काढा बनवण्याची पद्धत पाहून भुसावळकरांसाठी हा काढा ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करून दिला आहे. लाखो नागरीकांपर्यंत हा काढा पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगत महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व गुजरातमधूनही मागणी वाढल्याचे सांगितले.

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत
मन्सुरा काढ्याचा लाभ लाखो लोकांना मिळवून देणार असल्याचे भुसावळ नगरपरीषदेचे भाजपा गटनेते तथा एम.आय.तेली इंग्रजी माध्यम शाळेचे अध्यक्ष हाजी मुन्ना तेली यांनी सांगितले. नऊ जडी-बुटींचे मिश्रण असलेला हा काढा असून त्यासाठी स्वतंत्र मशनरी आणण्यात आल्याचे त्यांनी सांगत या काढ्याला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना आजाराशी प्रतिकार शक्ती वाढून कोरोनाशी जनतेला लढा देता यावा हा एकमेव उद्देश समोर ठेवून डॉ.रफीक अहमद, डॉ.जाकीर व सुमारे 50 जणांच्या टीमच्या मदतीने उच्च प्रतीचे मटेरीयल वापरून 10 लाख रुपये किमतीची मशिन व सुमारे 40 लाख रुपये किमतीचे मटेरीयल आणून जळगाव जिल्ह्यातील लाखो लोकांपर्यंत काढा पोहचविण्याचा मिशन असल्याचे तसेच महाराष्ट्रासह अन्य राज्यातही का काढा जात असल्याचे हाजी मुन्ना तेली यांनी सांगितले. हा काढा ज्या मालेगावच्या युनानी महाविद्यालयाच्या संकल्पनेतून तयार झाला आहे त्या मन्सुरा युनानी मेडीकल मध्ये शिक्षण घेतलेले महाराष्ट्र कौन्सील ऑफ इंडियन मेडीकलचे सदस्य डॉ.रफीक अहमद म्हणाले की, या माध्यमातून जनतेची सेवेची संधी मिळाली असून मन्सुरा काढ्याची सुरूवात करणार्‍या महाविद्यालयातच शिक्षण झाल्याचे आनंद आहे. या काढ्यात 9 युनानी मटेरिअल टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !