शिवपूर कन्हाळ्यात 1300 लिटर कच्चे रसायन नष्ट


आरोपी हिरू गवळी भुसावळ तालुका पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : शिवपूर कन्हाळा येथे तालुका पोलिसांनी धडक कारवाई करीत एक हजार 300 लीटर कच्चे रसायन जागेवर नष्ट करीत सुमारे 48 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करीत हिरू बुध्दू गवळी (रा.कन्हाळा) यास अटक केली. पोलिसांनी गुळ, महू, नवसागर, पत्री ड्रम आणि 60 लीटर तयार गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. पोलिस निरीक्षक कुंभार यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार, हवालदार विठ्ठल फुसे, युनूस इब्राहीम शेख, अजय माळी, प्रदीप इंगळे यांनी ही कारवाई केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !