सावद्यात रेल्वे स्थानकाजवळ दुचाकीसह चारचाकी पेटवली : वॉचमनलाही मारहाण


दोन लाख 28 हजारांचे नुकसान : अज्ञातांचा पोलिसांकडून कसून शोध सुरू

सावदा : सावदा रेल्वे स्टेशन जवळील शीतगृहाबाहेर अज्ञातांनी दुचाकी व व चारचाकीला पेटवल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली तर अज्ञातांनी वॉचमनलाही मारहाण केली. वाहने पेटवल्याने ब्बल दोन लाख 28 हजारांचे नुकसान झाले. सावदा स्टेशनजवळ सावदा रोडवर लक्ष्मण काशिनाथ शिंदे यांचे केळी साठवण करण्याचे शीतगृह (कोल्ड स्टोरेज) आहे. गुरुवारी रात्री रात्री वॉचमन बाबुभाई गुगाभाई वाघारी कर्तव्यावर असताना रात्री 11.15 वाजेदरम्यान अज्ञात 4 ते 5 आरोपींनी येथे वॉचमनला मारहाण करीत उभ्या असलेल्या स्विफ्ट डिझायर तसेच एक मोटर सायकल, केळी भरावयाचे कॅरेट तसेच इतर साहित्याला ज्वलनशील पदार्थाने आग लाऊन दिली. या आगीत दोन लाख रुपये किंमतीचे कार, 25 हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची मोटर सायकल, तीन हजारांचे प्लॅस्टीक कॅरेट मिळून दोन लाख 28 हजार रुपये किमतीचा सामान जळाला. याबाबत लक्ष्मण एकनाथ शिंदे यांनी सावदा पोलिसात फिर्याद दिल्यावरून सावदा पोलिसात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पांडुरंग सपकाळे, युसूफ तडवी व सहकारी करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !