वरणगाव नगरपरीषद साहित्य चोरी : अन्य दोघा आरोपींना अटक


वरणगाव : शहरातील रावजी बुवा परीसरातील नगरपरीषदेच्या अग्निशमन दलाच्या इमारतीतील वस्तू चोरी प्रकरणात आणखी दोघा संशयीत आरोपीना अटक करण्यात आल्याने आरोपींची संख्या आता सहा झाली आहे. त्यातील मुख्य आरोपींकडून 41 हजार 850 रुपये किंमतीच्या वस्तु जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात 13 दरवाजे, एक सिंमेट गोणी, सळई (आसारी) काही तुकड्यांचा समावेश आहे.

कोरड्या विहिरीतून वस्तू जप्त
नगर परीषदेने नव्याने उभारलेल्या अग्निशमन दलाच्या इमारतीतून 25 लाकडी दरवाजे व इलेक्ट्रीक पंम्पाच्या चोरी प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या आरोपी प्रशांत चौधरी व जितेंद्र भंगाळे याच्याकडून पोलिसांनी वरणगाव व परीसरातील एका शेतातील कोरड्या विहिरीतून चोरी केलेल्या दरवाज्यांपैकी 13 दरवाज्यांसह काही वस्तू हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणात आणखी अमोल उर्फ गोल्या चंद्रकांत चौधरी व चेतन प्रमोद पाटील (वरणगाव) शहर या संशयीताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री विपूल अनिल बर्‍हाटे व पवन रमेश माळी या दोघांना ताब्यात घेतल्याने एकूण आरोपींची सख्या सहा झाली आहे. त्यांच्याकडून चोरी गेलेल्या वस्तूंपैकी काही सळईचे (आसारी) तुकडे व (स्टाईल) फरशीच्या पेट्या असा एकून 41 हजार 850 रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास सहा.फौजदार सुनील वाणी, हवालदार गणेश शेळके करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !