कोरोनाचा उद्रेक कायम : जळगाव जिल्ह्यात पुन्हा 312 रुग्ण आढळले
जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 10 हजार 44 वर : आतापर्यंत 469 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात सोमवारी तब्बल 312 कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 10044 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून कोरोनामुळे आतापर्यंत 469 रुग्णांचे मृत्यू ओढवले आहे.
या शहरात आढळले कोरोनाबाधीत
जळगाव शहर 41
जळगाव ग्रामीण 11
भुसावळ 10
अमळनेर 25
चोपडा 26
पाचोरा 08
भडगाव 11
धरणगाव 14
यावल 10
एरंडोल 03
जामनेर 63
रावेर 13
पारोळा 17
चाळीसगाव 43
मुक्ताईनगर 13
बोदवड 01
अन्य जिल्हा 03

