भुसावळात रोटरीतर्फे पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान
पत्रकारांची भूमिका महत्वाची : रोटरी अध्यक्ष जी.आर.ठाकूर
भुसावळ : दैनंदीन घटना-घडामोडींचे वार्तांकन करण्यात पत्रकाराची भूमिका ही मोलाची असून आपल्या परीवाराला सोडून ते वेळेची काळजी न करता कार्य करत असतात शिवाय प्रत्येक घडामोडीत पत्रकारांची भुमिका महत्वाची असते, असे मत रोटरी क्लब ऑफ भुसावळचे अध्यक्ष जी.आर.(मामा) ठाकूर यांनी येथे व्यक्त केले. सोमवारी रोटरी क्लब ऑफ भुसावळ व बी.ए.लाहोटी चॅरीटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने रोटरी भवनात आयोजित पत्रकार सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते.
यांचा झाला सन्मान
या कार्यक्रमात संजयसिंग चव्हाण, शेख सत्तार, आशिष पाटील, प्रेम परदेशी, अभिजीत आढाव, निलेश फिरके, संजय काशीव, शाम गोविंदा, हबीब चव्हाण, कमलेश चौधरी, सुनील सूर्यवंशी, संतोष शेलोडे, कालू शाह, शकील पटेल, संजय ठाकूर, कलीम पायलट आदी पत्रकार व छायाचित्रकारांना सोलापूर चादर, सॅनीटायझर, मास्क व कोरोना योध्दा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पोलिस प्रशासनासह अन्य कर्मचार्यांचा होणार सन्मान
जी.आर.ठाकूर पुढे म्हणाले की, प्रत्येकाच्या सु:खदुखा:त पत्रकार नेहमी धावून येत मदत करतात मात्र पत्रकारांनाच समाज विसरतो. सर्वसामान्य जनतेला मदत करणार्या पत्रकारानंतर पुढील टप्प्यात पोलिस, महसूल, नगरपरीषद अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगारांचा लवकरच कोव्हीड योध्दा म्हणून सन्मानीत करण्यात येणार आहे. अध्यक्षीय भाषणात अरुण मांडाळकर म्हणाले की, सर्वच संघटनांना नेहमी पत्रकाराची कुठल्याही मदतीची अपेक्षा न ठेवता मदत मिळते त्यामुळे असे लॉकडाऊनमुळे छोटेखानी का नसो पत्रकारांसाठी हे कार्यक्रम व्हायला पाहिजे.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष जी.आर.ठाकूर, माजी अध्यक्ष राजेश अग्रवाल, अरुण मांडळकर, महेश भराडे, सतीश अग्रवाल, राजेश जोशी, गोपाल तिवारी, खुशाल जोशी, मदन बोरकर, सारंग चौधरी या मान्यवरांच्या हस्ते पत्रकार व छायाचित्रकारांना सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमासाठी राधेश्याम लाहोटी, आरती चौधरी यांचेही सहकार्य लाभले. आभार राजेश अग्रवाल यांनी केले. यशस्वीतेसाठी मनोज गुलईकर यांनी परीश्रम घेतले.

