चुंचाळ्यातील आशा सेविकेचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान
यावल : कोरोना योद्धा म्हणून यावल तालुक्यातील चुंचाळे येथील आशा सेविका जयश्री प्रकाश चौधरी यांचा सन्मान यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी निलेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार जितेंद्र कुंवर, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष पुरूजीत चौधरी, जिल्हा परीषद तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बराटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
कोरोना वीर योद्धा 2020 पुरस्कार जि.प.शिक्षण व क्रीडा सभापती रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. चुंचाळे येथील कर्तव्यदक्ष आशा स्वयंमसेविका जयश्री प्रकाश चौधरी, जि.प.सदस्य शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील (छोटू भाऊ), यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर, यावल पोलिस निरीक्षक अरुण धनवडे, यावल पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, डांभुर्णी सरपंच पुरुजीत चौधरी, यावल तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत बर्हाटे, साकळी येथील सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील, पत्रकार चंद्रकांत नेवे, किरण माळी, गोकुळ तायडे आदी उपस्थित होते.

