p>

वरणगाव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 73 विषयांना मंजुरी


वरणगाव- वरणगाव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहर विकासाच्या 73 विषयांना गुरुवारी मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुनील काळे होते. उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्याधिकारी संदीप गोसावी व नगरसेवक उपस्थित होते. शहरातील काही प्रभागांमध्ये स्वच्छता होत नसल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली असून दोन दिवसांवर गणपतीचे आगमन होणार असल्याने संपूर्ण गावाची स्वच्छता झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.

पंतप्रधान आवास योजना एजन्सीबाबत हरकत
पालिकेने यापूर्वी ठराव करून चेतन शिंदे नामक व्यक्तीच्या एजन्सीला पंतप्रधान आवास योजना घरकुल मंजूर करून आणण्यासाठी काम दिले आहे. आजच्या झालेल्या सभेमध्ये विषय क्रमांक 66 नुसार एजन्सी बदलण्याबाबत विषय मांडण्यात आला. योजनेत यापूर्वी जनतेचा 50 टक्के तर नगरपालिकेचा 50 टक्के करारानुसार एक हजार 216 फॉर्म भरून प्रति फार्म 250 रुपये अशी एकूण तीन लाख चार हजार रुपये लाभार्थीकडून जमा करण्यात आले असून उर्वरीत रक्क्कम पालिकेला भरायची आहे. सदर एजन्सीने शासनाकडे डीपीआर सादर केला असून नवीन एजन्सीला पुन्हा काम दिल्यास जनतेला पुन्हा फॉर्म भरून पैसे द्यावे लागतील व होणार्‍या नुकसानीला कोण जबाबदार ? असा प्रश्न विचारत या विषयावर लेखी हरकत घेण्यात आली. ही योजना सन 2022 पर्यंत असल्याने पुन्हा सर्वेक्षण करणे मंजूर करण्यासाठी कालावधी लागल्याने या योजनेपासून गरीब कुटुंब वंचित राहतील, असे निवेदनात नमूद आहे. या निवेदनावर विरोधी पक्ष नेते राजेंद्र चौधरी, नगरसेवक विष्णू खोले, रवींद्र सोनवणे गणेश चौधरी, प्रतिभा चौधरी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


कॉपी करू नका.