यावलमध्ये गुरांची बेकायदा वाहतूक : तिघांविरुद्ध गुन्हा
यावल : गुरांची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावल पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व सहकार्यांना शहरातून गोवंश तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी पहाटे पावणेपाच वाजता महिंद्रा पीकअप (क्र.एम.एच.19 बी.एम.3357) जाकिर हुसेन विद्यालयावळील हडकाई नदीच्या पुलावर आल्यानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यात सहा बैलांची दाटीवाटीने वाहतूक होत असल्याने आढळून आल्यानंतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरुद्ध गुन्हा
ही कारवाई यावल पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय शाखेचे पोलिस कर्मचारी सुशील घुगे, शामकांत धनगर, वारूळकर, होमगार्ड यांनी केली. या प्रकरणी सुशील रामदास घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दगडू आनंदा साळुंके (40, रा.ठाणेदरवाजा, सिद्धार्थ नगर, चोपडा), असीम इसाक शेख (21, रा.मिल्लतनगर, चोपडा) व जावेद्दीन काझी (42, मोमनअली, रा.चोपडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.

