जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 205 रुग्ण आढळले


जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 10249 वर : 24 तासात 12 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा 205 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 10 हजार 249 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात तब्बल 12 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील मृतांची संख्या 481 झाली आहे. दरम्यान, एकाच दिवसात जळगाव शहरात 60 रुग्ण आढळले आहेत.

या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 60
जळगाव ग्रामीण 18
भुसावळ 20
अमळनेर 08
चोपडा 05
पाचोरा 13
भडगाव 08
धरणगाव 25
यावल 07
एरंडोल 04
जामनेर 09
रावेर 20
पारोळा 01
चाळीसगाव 06
मुक्ताईनगर 00
बोदवड 00
अन्य जिल्हा 01



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !