एक वर्ष कोणतेही मानधन न घेता सेवा करण्याचा रेल्वे अ‍ॅप्रेंटीस धारकांचा निर्णय


ऑल इंडिया रेल्वे अ‍ॅप्रेंटीसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भरत परदेशी यांची माहिती

भुसावळ : भारतातील अ‍ॅप्रेंटीसधारक हे भारतीय रेल्वे सोबत असून या कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये भारताची आर्थिक तसेच रेल्वे मंत्रालयाची आर्थिक स्तिथी पाहता संपूर्ण भारत भरातील 50 हजारांच्या जवळपास रेल्वे अ‍ॅप्रेंटीस युवक एक वर्ष कोणतेही मानधन न घेता रेल्वेची सेवा करण्यास उत्सुक आहेत. रेल्वे मंत्रालयाला अ‍ॅप्रेंटीस युवकांमुळे 15 अरब रुपयांचा फायदा तसेच सुदृढ मनुष्यबळ मिळणार असल्याची माहिती ऑल इंडिया रेल्वे अ‍ॅपेंन्ट्रीस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भरत परदेशी यांनी दिली.

रेल्वे मंत्र्यांशी केली चर्चा
एआएआरएफ महामंत्री शिवगोपाल मिश्रा यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन रेल्वे कर्मचार्‍यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. बर्‍याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या काही मागण्यांना पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्री यांनी हिरवा कंदील दिला आहेव त्या विषयीचे आदेश सुद्धा रेल्वेमंत्री यांनी रेल्वे बोर्ड तसेच सी.आर.बी.यांना दिले आहे तसेच अ‍ॅक्ट अ‍ॅप्रेंटीसच्या मुद्यावर सुद्धा महामंत्री यांनी सविस्तरपणे चर्चा करून रेल्वे मंत्र्यांना रेल्वे अ‍ॅक्ट अ‍ॅप्रेंटीसविषयी माहिती सांगितली. रेल्वेमध्ये अ‍ॅप्रेंटीस केलेले युवकांना रेल्वे वातावरणाची संपूर्ण माहिती असून रेल्वेला या अ‍ॅप्रेन्ट्रीस युवकांपासून प्रोडक्शन युनिटमध्ये भरपूर फायदा झालेला आहे व अजूनही होऊ शकतो होऊ शकतो. 20 टक्के जो कोटा जो अ‍ॅप्रेंटीससाठी राखीव ठेवला गेला होता तो पूर्णपणे अयशस्वी झाला असून अ‍ॅप्रेंटीसयुवकांना यापासून कोणताच फायदा झाला नाही. रेल्वे अ‍ॅप्रेंटीस युवक हे टेक्निकल श्रेत्रातील असून त्यांचा नॉन टेक्निकलचा पेपर घेण्यात आला त्यामुळे हीयुवक पास होऊ शकले नाही आणि जे पास झाले त्यांना फिजिकल टेस्टच्या दरम्यान बाहेर काढले गेले. रेल्वे मंत्री यांनी जेव्हा कोर्टाच्या निकालाची आठवण दिली असता, महामंत्री यांनी सांगितले की, कोर्टाच्या निकालानंतर ही संपूर्ण भारतभरात 50 हजार रेल्वे अ‍ॅप्रेंटीस युवकांना पक्का रोजगार दिला गेला होता. महामंत्री यांनी सांगितले की, हे नवयुवक आहेत आणि यांनी रेल्वेसाठी आपला वेळ दिला असुन रेल्वेच्या संपूर्ण वातावरणाची यांना माहिती तसेच जाणीव आहे. रेल्वे मंत्री यांनी सांगितले की, फेडरेशन तसेच रेल्वे बोर्ड व सीआरबी यांच्यामध्ये चर्चा करून अ‍ॅप्रेंटीस युवकांसाठी सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, असेही ते म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !