भुसावळ गटसाधन केंद्रात दोन विस्तार अधिकार्‍यांची नियुक्ती


शिक्षक संघटनांकडून दोघा अधिकार्‍यांचा झाला गौरव

भुसावळ : शहरातील गट साधन केंद्रात माध्यमिक शिक्षण विभाग जळगाव येथून बदली होऊन शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे व बी.डी.धाडी यांनी मंगळवारी सकाळी पदभार स्वीकारला. त्यांचे स्वागत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, मुख्याध्यापक संघटनेचे सचिव जी.आर.चौधरी, जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे संपादक ए.आर.धनपाल, मुख्याध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष एस.पी.भिरूड, सदस्य जे.पी.सपकाळे, इब्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर.धनगर, शिक्षक परीषदेचे एस.एस.अहिरे, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक संजय भटकर, इस्तू संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नरवाडे, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखेडे, गटसाधन केंद्रातील विषय तज्ञ शिक्षक संजय गायकवाड, रमेश दांगोडे आदींनी भेट घेतली व गौरव देखील केला. यावेळी त्यांच्या सोबत चर्चा करून तालुक्याच्या शैक्षणिक उपक्रमाविषयी चर्चा करण्यात आली.

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी होणार मदत
तुषार प्रधान म्हणाले की, तालुक्याचा कार्यभार अधिक वेगाने करत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मदत होणार आहे. नवनियुक्त शिक्षण विस्तार अधिकारी किशोर वायकोळे म्हणाले की, संघटनांच्या मदतीने व शिक्षकांच्या जोरावरती आपण तालुक्यातील गुणवत्तेची व कार्यालयाची वाटचाल संगणकीय करून शिक्षकांना कागदपत्रे देण्यासाठी कार्यालयात येण्याचा त्रास वाचवणार आहे. बी.डी.धाडी म्हणाले की, जळगाव येथील माध्यमिक शिक्षण विभागाच्या कामाच्या अनुभवावर भुसावळ तालुक्यातील कामांची विभागणी करून प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. सूत्रसंचालन संजय भटकर यांनी तर आभार सुनील वानखेडे यांनी मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !