धक्कादायक : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 345 रुग्ण आढळले
जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 12 हजार 381 वर : आतापर्यंत 564 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात मंगळवारी तब्बल 345 कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 12 हजार 381 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात 15 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून कोरोनामुळे आतापर्यंत 264 रुग्णांचे मृत्यू ओढवले आहेत.
या शहरात आढळले कोरोनाबाधीत
जळगाव शहर 50
जळगाव ग्रामीण 11
भुसावळ 09
अमळनेर 31
चोपडा 22
पाचोरा 44
भडगाव 77
धरणगाव 17
यावल 03
एरंडोल 00
जामनेर 29
रावेर 07
पारोळा 15
चाळीसगाव 14
मुक्ताईनगर 14
बोदवड 00
अन्य जिल्हा 00

