युपीएससी परीक्षेत यश : कांतीलाल पाटील यांचा सत्कार
वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्यांनी तपतकठोर्यात जावून केला सन्मान
वरणगाव : युपीएससी परीक्षेत तालुक्यातील तपतकठोरा येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील कांतीलाल सुभाष पाटील यांनी यश मिळवत गावाचे नाव उंचावल्याने त्यांचा मंगळवारी सायंकाळी तपतकठोरा येथे जाऊन वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्यांनी सत्कार केला.
जिल्हाधिकारीपदी झाली नियुक्ती
मुळचे तपतकठोरा येथील रहिवासी सुभाष बळीराम पाटील यांचे सुपुत्र कांतीलाल सुभाष पाटील यांनी नुकतीच युपीएससी परीक्षा दिली होती. त्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत कांतीलाल पाटील हे उत्तीर्ण होऊन त्यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याने तपत कठोरा गावासह वरणगाव परीसरासह संपूर्ण जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
या यशाबद्दल वरणगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सायंकाळी तपतकठोरा येथे जाऊन कांतीलाल पाटील यांचासह त्यांचा परीवारातील सदस्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक विष्णू खोले, रवींद्र सोनवणे, गणेश सुपडू चौधरी, समाधान चौधरी, साजीदभाई कुरेशी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष संतोष माळी, अल्पसंख्याक जिल्हा संघटक पप्पूभाई जकातदार, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष गजानन वंजारी, तालुका सरचिटणीस राजेश चौधरी, एहसानभाई अहमद, आकाश झोपे, सोहेल कुरेशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

