वरणगावात दुचाकीची चोरी : एका आरोपीला अटक
वरणगाव : येथून जवळच असलेल्या वरणगाव फॅक्टरी वसाहतीतून दुचाकी चोरी केल्याप्रकरणी वरणगाव पोलिसांनी एकास अटक केली आहे. आरोपीला मंगहवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दीपक तोताराम मराठे (37, रा.वरणगाव फॅक्टरी, क्वॉर्टर नंबर 213, ई मॉडिफाईड) यांच्या मालकीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी (एम.एच.19 बी.एन.3275) अज्ञात चोरट्यांनी पार्किंग शेडमधून लांबवली होती. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गोपनीय माहितीवरून पंकज जगन्नाथ तायडे (24, दर्यापूर, ता. भुसावळ) यास अटक केली होती. आरोपीला मंगळवारी न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय नरसिंग चव्हाण, हवालदार अतुल बोदडे, योगेश जोशी, पवन दुसाने आदींनी केली.

