सावद्यात वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू
सावदा : शहरातील रहिवासी रमेश पाव्हणू लोखंडे (60) यांचे दिनांक 3 रोजी रात्री 8.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, चार भाऊ, तीन बहिणी, तीन मुले, पुतणे, तीन जावई, नातवंडे असा परीवार आहे. ते नुतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चिनावल येथील उपमुख्याध्यापक गणेश पाव्हणू लोखंडे, शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल पाव्हणू लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी जितेंद्र पाव्हणू लोखंडे व संतोष पाव्हणू लोखंडे यांचे मोठे भाऊ तर ग्रामसेवक राहुल रमेश लोखंडे, अतुल लोखंडे, मनोज लोखंडे यांचे वडील तर उमेशचंद्र लोखंडे यांचे काका होत.

