विरेंद्र व जयवंत भोईटेंसह चौघांविरुध्द अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा


‘मविप्र’: पदोन्नतीसाठी 25 हजार घेतल्याचा आरोप

जळगाव : मुख्याध्यापकाच्या पदोन्नतीसाठी 25 हजार रुपये घेऊन जातीवाचक शिवीगाळ करून नायगावच्या प्रभारी मुख्याध्यापकाला धमकावल्याप्रकरणी मराठा विद्या प्रसारक संस्थेचे जयवंत बाबुराव भोईटे, विरेंद्र रमेशचंद्र भोईटे, ललित बाबुराव भोईटे व राजेंद्र पितांबर पाटील यांच्याविरुध्द मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रभारी मुख्याध्यापकांनी दिली तक्रार
यावल तालुक्यातील नायगाव येथील ‘मविप्र’ संस्थेच्या सातपुडा माध्यमिक विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापक असलेले रवींद्र भास्कर सोनवणे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. संस्थेच्या वरीष्ठ पदाधिकार्‍यांनी आपल्याला प्रभारी मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी दिलेली आहे, मात्र या पदाबाबत संस्थेचे संचालक जयवंत भोईटे व विरेंद्र भोईटे यांना राग असून आम्ही तुला पदोन्नती मिळू देणार नाही असे सांगून तिरस्कार करायला लागले. तुला आम्ही कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकवू किंवा अपघातात ठार मारु, तुला जगू देणार नाही असे धमक्या द्यायला लागले. 11 सप्टेबर 2019 रोजी कोर्ट कॅन्टीन परिसरात बोलावून पदोन्नतीसाठी 50 हजारांची मागणी केली. भीतीपोटी त्यांना 23 सप्टेबर रोजी जिल्हा परीषदेच्या आवारात 25 हजार रुपये दिले. दरम्यान, ही रक्कम दिल्यानंतर भोईटेंचा तगादा व त्रास सुरुच राहिला. त्यामुळे तब्येत बिघडल्याने मी रजेवर गेलो नंतर 24 फेब्रुवारी 2020 रोजी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यानंतर नियमित शाळेत जायला लागलो असता जयवंत व विरेंद्र भोईटे यांनी त्रास देणे सुरूच ठेवले मात्र दरम्यानच्या काळात या दोघांचा संस्थेच्या पदावरुन हटविल्याचे समजले त्यामुळे 28 जुलै 2020 रोजी त्यांच्याकडे माझे 25 हजार रुपये परत मागितले असता दोघांनी जातीवाचक शिवीगाळ करुन पैसे मिळणार नाही, तुझ्याने जे होईल ते करुन घे, असे म्हणत दम दिला. यावेळी शिपाई ललित भोईटे व राजेद्ंर पाटील हे देखील होते. या सर्वांनीच शिवीगाळ केली. यावल, किनगाव या परिसरात आमचे माणसे खूप असून तुझ्याने आमचे काहीच होणार नाही, असे सांगून धमकावणे सुरु ठेवल्याचे तक्रारीत म्हटले

आहे.

 

 

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !