शिवकॉलनीजवळील एटीएम फोडणारे हरीयाणातील संशयीत जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात


उत्तर प्रदेश पोलिसांनी आवळल्या होता मुसक्या : एक संशयीत अद्यापही फरार

जळगाव : शहरातील शिव कॉलनी उड्डाण पुलाजवळ असणारे एसबीआयचे एटीएम फोडून तब्बल 14 लाख 41 हजारांची रोकड लांबविणार्‍या हरीयाणातील संशयीत दोघा भावंडांना जिल्हा पेठ पोलिसांनी उत्तरप्रदेश पोलिसांकडुन ताब्यात घेतले आहे. दोघांनी जळगावातील एटीएम फोडून रक्कम लांबवल्याची कबुली दिली असून या गुन्ह्यात एक जण अद्यापही पसार आहे.

काय घडली होती घटना
शिव कॉलनी रेल्वे उड्डाण पुलाच्या अलीकडे स्टेट बँकेची शाखा आहे. त्याच्या बाहेर एक एटीएम सेंटर असून त्यात कॅश भरणा आणि एटीएम अशी दोन एटीएमची मशीन आहेत. 12 जुलै रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हे दोन्ही एटीएम तोडले असल्याचे या परीरातील रहिवाशांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. यात संबंधीत एटीएम हे गॅस कटरने तोडून चोरट्यांनी यामध्ये असणारी 14 लाख 41 हजार रूपयांची कॅश लांबवून पोबारा केल्याचे स्पष्ट झाले होते. तर या एटीएममध्ये असणारी सात लाख रूपयांची रोकड मात्र चोरट्यांना न दिल्याने सुरक्षित राहिली होती. पोलिसांनी बँकेने लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता. यात तीन जण तोंडाला रूमाल बांधून मध्यरात्री 1 वाजून 55 मिनिटांनी दाखल झाले. दोन्ही एमटीएम गॅस कटरने फोडून रोकड घेवून तीने चोरटे 2 वाजून 33 मिनीटांनी एटीएमच्या बाहेर पडले. यावेळी सोबत चारचाकी गाडी असल्याची माहिती समोर आली होती. भर वस्तीमधील एटीएम फोडून तब्बल 14 लाखांची रक्कम लंपास करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली होती.

हरियाणामधील दोघ भावंड ताब्यात ; एक पसार
उत्तरप्रदेश व हरीयाणाच्या सीमेवर यातील दोघांना पकडण्यात आले असून तिसरा मात्र निसटण्यात यशस्वी झाला आहे. निसार शफुर सैफी (38) आणि त्याचा लहान भाऊ इरफान शफुर सैफी (29, रा.पलवल, हरीयाणा) यांना अटक केली आहे. तर तिसरा मुख्य सुत्रधार कुरशीद मदारी सैफी (रा. अंघोला ता.पलवल, हरीयाणा) हा पसार आहे. या दोन्ही आरोपींनी जळगावात एटीएम फोडल्याची कबुली दिली. यामुळे तेथील पोलिसांनी जिल्हापेठ स्थानकाशी संपर्क साधला. यानंतर केलेल्या चौकशीत एसबीआयचे एटीएम फोडणारे हेच दोघे असल्याची खात्री पटल्याने या दोन्ही आरोपींनी जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !