भुसावळात जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघण भाजपा पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा


भुसावळ : जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागून असताना कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्स न पाळता सरकारविरुद्ध घोषणाबाजी करीत दूध दरवाढीसाठी आंदोलन केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार संजय सावकारे यांच्यासह पदाधिकार्‍यांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कर्मचारी सचिन पोळ यांच्या फिर्यादीनुसार, आमदार संजय सावकारे, भाजपा संघटन सरचिटणीस डॉ.सुनील नेवे, शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, पवन बुंदेले, अमोल अरविंद महाजन, किशोर पाटील, पुरूषोत्तम नारखेडे, गिरीश महाजन, अर्जुन खरारे यांच्यासह अन्य 10 ते 12 पदाधिकार्‍यांविरुद्ध भादंवि 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !